शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी; हिंगोलीच्या हल्लाबोल आंदोलनातून अजित पवारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 17:57 IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नाही असेच आहे. यामुळे एकतर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना केली.

हिंगोली : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शेजारच्या कर्नाटकात जावून त्या राज्याचा उदो-उदो करीत आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न माहिती असताना त्यांचे हे कृत्य म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेची काही देणे-घेणे नाही असेच आहे. यामुळे एकतर त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात बोलताना केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची हल्लाबोल यात्रा आज हिंगोली येथे आली होती. यावेळी आयोजित सभेत व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावर, आ. रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जगजित खुराणा यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजप सरकार फेकू सरकार आहे, अच्छे दिनच्या नावाखाली सरकारने केवळ शेतकरी व जनतेची लूट केली आहे. लोकशाहीत सरकारची ही हुकूमशाही कदापी खपवून घेतली जाणार नाही. भिमाकोरेगाव येथील घटना का घडली याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असून सत्ताधार्‍यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. 

यासोबतच धनंजय मुंडेयांनीसुद्धा उपहासात्मक शैलीत केंद्र व राज्य शासनावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होवून दिलेली आश्वासने खोटी निघाली. त्याच आईच्या चरणी डोके ठेवून हे खोटारडे सरकार उलथवून टाकण्याची शक्ती मागितली आहे. महागाई संपली पाहिजे असे सांगणार्‍या भाजपने १ डिसेंबर २0१७ पासून आजपर्यंत १७ रुपयांनी पेट्रोल अन् १३ रुपयांनी डिझेल वाढविले असल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री